little information
सोलापूर - वीर गणपती ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेत स्वरुप संतोष सपकाळने प्रथम क्रमांक मिळविले असून प्रणाली एकनाथ गणपा (द्वितीय), रक्षा उमेश गायकवाड (तृतीय) क्रमांक मिळविले आहे. या वीर गणपती रंगभरण स्पर्धेत ३९ मुलामुलींनी सहभाग घेतला होता. अनुष्का मनोज चिल्लाळ व श्रद्धा चंदन भैसे या दोघांनीही विशेष उत्तेजनार्थ मिळविले असून या स्पर्धेचे परीक्षक म्हणून चित्रकार रोहन पोरे यांनी काम पाहिले.
यावर्षी तमाखूमुक्तीसाठी फेसबुक लाईव्ह व्याख्यान घेण्यात आले. मंडळाच्या ट्रस्टमध्ये अध्यक्ष सतीश सपकाळ, उपाध्यक्ष अमोल सुपे, शेखर गणेश, सचिव अवधूत ढगे, सहसचिव रामनाथय सरवदे, खजिनदार श्रीकांत सरवदे, कार्याध्यक्ष ऋषिकेश शिंदे, सहकार्याध्यक्ष संतोष कांबळे, विश्वस्थ मोहन माळवतकर, तुळशीदास वांझरे, आनंद गायकवाड, विश्वस्थ मधुकर मळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर - वीर गणपती ट्रस्टच्यावतीने 'वीर गणपती वार्षिक विषेशांका'चे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी नगरसेवक महेश कोठे, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, भालचंद्र पगड्याल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सतीश सपकाळ, गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश गायकवाड, ट्रस्टचे सल्लागार नंदूदादा सपार, अंबर सरवदे, परमेश्वर गदगे, संतोष सपकाळ, निशांत पोरे, बिपीन झुंजूर, गोवर्धन म्याकल गुरुजी आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना महेश कोठे म्हणाले कि, वीर गणपती ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवात कोणतेही भंपकपणा किंवा धांगडधिंगा न करता विधीवत पूजाअर्चा तसेच गोसेवा, सुवर्ण सिद्धेश्वर अभियानासाठी दिलेले योगदान, योगासन स्पर्धा, महिलांची महाआरती, अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अर्पण केलेली देणगी, कोरोनाच्या कठीण काळात गरजू कार्यकर्त्यांना केलेली मदत पाहता वीर गणपती ट्रस्टने समाजापुढे एक आदर्श निर्माण केले आहे. हा आदर्श इतर मंडळानेही घेण्यासारखा आहे. तसेच आज गणरायाकडे जगावर आलेले संकट लवकरात लवकर दूर होऊन जनजीवन पूर्ववत व्हावे, अशी सदिच्छाही महेश कोठे यांनी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 'श्री'ची पूजा करण्यात आली. सदर विशेषांकात ट्रस्टच्या स्थापनेपासून ते आज पर्यंतच्या सर्व गणेशोत्सव, जयंती, वेबसाइट, सामाजिक उपक्रम व ताळेबंद पत्रक, कोरोना योद्यांचा सन्मान आदि सर्व माहिती देण्यात आली आहे.
यावेळी श्रीकांत सरवदे, अमोल सुपे, मंदार वाघमोडे, अवधूत ढगे, ऋषिकेश जिंदे, मोहन माळवदकर, रामदास सरवदे, शेखर गणेश, राजेश गायकवाड, मधुकर मळेकर, बसवराज कांबळे, संतोष उकरंडे, तुळशीदास वांझरे, दीपक सुपेकर, डॉ. रुपेश येडके, सुनील सरवदे, नरेंद्र पुराणिक, विजय भैसे, संदीप सरवदे, रविकांत दिवटे, संतोष कण्णीकर, श्रीकांत कण्णीकर, सागर सरवदे, सतीश सपार, अमरदीप सपार, सागर सुपे, समर्थ सुपे, श्रीकांत टोणपे, प्रशांत सुपे, प्रशांत सरवदे, रामचंद्र गदगे सौदागर तरटे, शुभम तरटे, अक्षय सपार, चेतन जिंदे, अक्षय जिंदे, विनायक ताला, गोविंद भैसे, शंकर श्रीकोंडा, कुमार कोलप्याक, शिवकांत झिपरे, सिद्धलिंग कण्णीकर, रत्नाकर दासरी, स्वप्नील गुळेद, आशिष उपरे, चंद्रकांत झिपरे, विक्रांत पोरे, प्रकाश साखरे, विशाल मिठ्ठा, सोहन उकरंडे, शुभम सरवदे, नरेश अक्कल, अक्षय गुळेद, वेदांत कोंगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यंदाच्या वर्षी प्रतिष्ठापनेची पूजा उत्सव समितीचे अध्यक्ष श्री उमेश गायकवाड व त्यांच्या पत्नी आणि वीर गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष श्री सतीश सपकाळ व त्यांच्या पत्नींच्या हस्ते करण्यात आली.
To know about our inspiration, our journey, various details about the festival celebration and social activities
Memories...
Meet our trustee
All to contact us